हार आणि प्रहार
------------
कलावंतांच्या कामगिरीचं कौतुक करण्यासाठी पाठीवर दिली जाणारी थाप म्हणजे पुरस्कार. परंतु, गेल्या काही वर्षांमध्ये वेगवेगळ्या पुरस्कार सोहळ्यांचं जे पीक आलंय, त्यामध्ये कलावंतांचं कौतुक होण्याऐवजी त्यांची बदनामीच अधिक होत असल्याचं चित्र प्रकर्षानं समोर आलं आहे. प्रसिद्ध अभिनेता प्रसाद ओक यानं "झी मराठी' वाहिनीविरूद्ध नुकतीच जी तोफ डागली आणि त्यानिमित्तानं मराठी चित्रपटसृष्टीत ज्या प्रतिक्रिया उमटल्या त्या पाहिल्यानंतर या विषयाचं महत्त्व लक्षात येतं. "झी'च्या पुरस्कार सोहळ्यात आपल्या चारित्र्याचं हनन केल्याचं प्रसादचं म्हणणं आहे. अर्थात, प्रसादसारखा अनुभव यापूर्वीही अनेक कलावंतांच्या वाट्याला वेगवेगळ्या सोहळ्यांमध्ये आलाय. फक्त मराठी चित्रपट पुरस्कारांपुरताच हा विषय मर्यादित नसून विविध संस्थांतर्फे दिल्या जाणाऱ्या हिंदी चित्रपट पुरस्कार सोहळ्यांमध्येही असे प्रकार यापूर्वी घडले आहेत. प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर-साजीद खान यांच्यातील शेरेबाजीही अशीच बराच काळ वादग्रस्त ठरली होती. परंतु, पूर्वीच्या कटू प्रकारांमधून काही धडा न घेता पुरस्कारांचं आयोजन करणारी मंडळी आणि पुरस्कार सोहळ्यांमध्ये सहभागी होणारी मंडळी त्याच त्याच चुकांची पुनरावृत्ती करीत आहेत.
पुरस्कार सोहळ्यांची संख्या वाढल्यानं हल्ली प्रत्येक वाहिनी आपला सोहळा इतरांपेक्षा कसा वेगळा आणि "हट के' होईल, याकडे अधिक लक्ष देत आहे. परंतु, "हट के' करण्याच्या नादात आपल्याकडून होणाऱ्या चुका त्यांच्या लक्षात येत नाहीत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या वाहिन्यांवर कलाकारांची बदनामी केल्याचा आरोप आहे, त्या आणि संबंधित कलाकारांचे तत्पूर्वी अतिशय चांगले संबंध असल्याचं लक्षात येतं. त्यामुळे कलावंतांच्या बदनामीचे प्रकार नक्की कोणत्या कारणामुळे घडतात, हा खरोखरीच एक शोधाचा विषय बनलाय. असा एखादा प्रकार घडला की संबंधित वाहिनी सोहळ्याचे आयोजन आणि "स्क्रीप्ट' लेखकांना झालेल्या चुकीबद्दल जबाबदार धरतात. परंतु, अशी जबाबदारी निश्चित झाल्यानंतरही कोणावर कसलीही कारवाई झाल्याचं ऐकीवात नाही. तसेच ज्या वाहिन्या कलावंतांचा "अजिंक्यतारा' नावानं गौरव करतात, तसेच त्यांना आपले "ब्रॅंड ऍम्बेसेडर' बनवितात, त्या वाहिन्यांनी अपघातानं का होईना कलावंतांची बदनामी झाली तरी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करण्याचा मोठेपणा दाखवित नाहीत.
या सगळ्या प्रकारामध्ये कलावंतांकडून होणाऱ्या चुकांना माफ करता येणार नाही. सूत्रसंचालकाकडून भलतंच वक्तव्य केलं गेलं की तो त्यासंबंधीची जबाबदारी स्वतःवर न घेता "स्क्रीप्टरायवर'वर टाकून मोकळा होतो. आपल्या तोंडी असलेलं वक्तव्य जर आपल्याच परिवारातील एखाद्या सहकाऱ्याशी संबंधित असेल तर ते न म्हणण्याचं धाडस सूत्रसंचालक का दाखवीत नाहीत ? तसेच एखाद्या कलाकाराची बदनामी झाल्याचं सर्वांना समजत असूनही संबंधित वाहिनीविरुद्ध कधी कोणी एकत्रितपणे आवाजही उठवीत नाहीत. त्यामागचं कारण म्हणजे प्रत्येकाला लोकप्रिय वाहिनीबरोबरचे आपले हितसंबंध जपायचे असतात. त्यामुळेच वाहिन्यांकडून चूक झाल्याचं समजत असूनही त्याविरुद्ध एकत्रितपणे लढा देण्याचं कोणाला उमजत नाही. तसेच ज्या कलाकाराची वाहिन्यांकडून कथित बदनामी झाली आहे, त्या कलाकारांची भूमिकादेखील तळ्यात-मळ्यात असते. संबंधित वाहिनीविरुद्ध भविष्यात आपण काम करणार नाही, अशी भूमिका घेण्याचं धाडस ते का दाखवीत नाहीत ?
सर्वसामान्यांच्या दृष्टीकोणातून या घडामोडींचा विचार केल्यास त्यात त्यांना फारसं काही खटकत नाही. कारण, टीव्हीवरील कार्यक्रम असतात ते मनोरंजनासाठी. पुरस्कार सोहळे हे कधीच गांभीर्यानं घ्यायचे नसतात, असा समज रुढ झालाय. त्यामुळे अशाप्रकारची थट्टा-मस्करी त्यात चालतेच, असं प्रेक्षकांनीच आता गृहित धरलंय. त्यामुळे पुरस्कार सोहळ्यांचं आयोजन करणाऱ्यांनी आपली विश्वासार्हता तपासायला हवीय तसेच कलावंतांनीही निव्वळ प्रसिद्धी मिळतेय, यावर आनंद न मानता आपण कोणत्या सोहळ्यात सहभागी होतोय, याचीही काळजी घ्यायला हवी. तसं घडलं तरच अशा अपघातांची संख्या कमी होईल.
प्रीमियर' मासिक
Friday, April 29, 2011
Tuesday, March 31, 2009
review - बारह आना
वेगळ्या वाटेचा भन्नाट सिनेमा
"बारह आना' हा खूप इंटेलिजिएण्ट सिनेमा आहे. तो एकाचवेळी आपल्याला हसवतो, कोड्यात टाकतो आणि काही प्रमाणात अंतर्मुखही करायला लावतो. सध्याच्या मल्टिप्लेक्स कल्चरमधला एक अत्यंत प्रभावी चित्रपट म्हणून त्याची नोंद करावी लागेल. शोफर, वॉचमन आणि वेटर... या समाजातल्या तशा तीन उपेक्षित व्यक्तिरेखा. त्यांच्यावर एखादा हिंदी चित्रपट बनू शकतो, असा विचारही कधी आपल्या मनात येऊ शकणार नाही. पण दिग्दर्शक राजा मेनन यांनी या तीन व्यक्तिरेखांचा खूप सुरेख मेळ घालून एक वेगळ्या पद्धतीचं मनोरंजन दिलंय.
नसिरुद्दीन शाह यांनी साकारलेली व्यक्तिरेखा म्हणजे शोफर. ते धनाढ्य व्यक्तीच्या गाडीवर शोफर म्हणून काम करीत असतात. मात्र, आपल्या मालकिणीकडून सतत त्यांना हिडीसफिडीस पद्धतीची वागणूक मिळत असते. विजय राज हा वॉचमन असतो. बिल्डिंगवर लक्ष ठेवण्याऐवजी त्याला तिच्यात राहणाऱ्यांचीच अधिक कामं करावी लागत असतात. उत्पन्न कमी आणि गावाकडे राहणाऱ्या आपल्या कुटुंबीयांचा खर्च या कात्रीत तो अडकलेला असतो. तिसरा असतो वेटर अर्जुन माथूर. एका चांगल्या हॉटेलमध्ये तो वेटरची नोकरी करीत असतो. तिथं येणाऱ्या एका विदेशी तरुणीलाच तो आपलं हृदय देऊन बसतो. या तिघांच्या कथानकांना एकत्र जोडणारा धागा म्हणजे त्यांचं निवासाचं स्थान. एका चाळीतल्या खोलीत हे तिघं एकत्र राहत असतात. आपापल्या परिस्थितीला दोष देत आयुष्य कंठण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नसतो. मात्र एकेदिवशी विपरीत घडतं. वॉचमनच्या हातून एका व्यक्तीला नकळत थप्पड बसते आणि सुरू होतं अपहरणाचं सत्र. त्यातून मानवी मनाचे वेगवेगळे कंगोरे प्रेक्षकांसमोर येतात.
दिग्दर्शक राजा मेनन यांनी हा सगळा घटनाक्रम अतिशय छानरीत्या चित्रित केलाय. समाजातल्या उपेक्षित घटकांचं दुःख त्यांनी चित्रपटाच्या सुरुवातीला टिपलंय आणि मध्यांतरानंतर त्याला त्यांनी वेगळीच फोडणी दिलीय. छोट्या-छोट्या प्रसंगांमधून त्यांनी संपूर्ण चित्रपट खुलवलाय. हा चित्रपट विलक्षण उंचीवर गेलाय तो कलाकारांच्या अभिनयामुळे. वॉचमनची भूमिका करणाऱ्या विजय राजनं या चित्रपटातील अभिनयाद्वारे आपली सर्वोत्तम कामगिरी नोंदवलीय. वॉचमनच्या व्यक्तिरेखेतील बारीकसारीक गोष्टी त्यानं आपल्यात इतक्या सफाईनं मुरवल्यात की आपल्याला खरा विजय राज आठवतच नाही. नसिरुद्दीन शाह हा कलावंत एवढ्या उंचीवर का पोचलाय, हे जाणून घेण्यासाठी तरी हा चित्रपट पाहायलाच हवा. संपूर्ण चित्रपटात हा कलाकार फक्त क्लायमॅक्समध्ये काही वाक्य बोललाय, पण त्यांचं न बोलणंही बरंच काही बोलून गेलंय. फक्त आपल्या "स्क्रीन प्रेझन्स'द्वारे त्यांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवलंय. अशाप्रकारची अदाकारी आपल्याला नवीन आहे. वेटरची भूमिका करणाऱ्या अर्जुन माथूर यानेही छान काम केलंय. चित्रपटात एकही गाणं नाही ही सर्वात चांगली गोष्ट. हिंदी सिनेमा सध्या खूप चांगल्या वळणावर आहे. "बारह आना' हा त्याच वळणावरचा एक चित्रपट आहे.

Saturday, August 23, 2008
review-"मान गये मुघल-ए-आझम'
"शोले' आणि "जाने भी दो यारो...' या दोन अशा कलाकृती आहेत की, ज्या वारंवार तरुण निर्माता-दिग्दर्शकांच्या स्वप्नात येतात आणि त्यांना नको ते करायला भाग पाडतात. लेखक-दिग्दर्शक संजय छेल यांचा "मान गये मुघल-ए-आझम' हा सिनेमासुद्धा अशाच एका भंगलेल्या स्वप्नाची कहाणी आहे.
"मान गये मुघल-ए-आझम' या "टायटल'वरून या सिनेमाचा के. आसिफ यांच्या "मुघल-ए-आझम'शी अगदी जवळचा संबंध असेल, असं वाटण्याची शक्यता आहे; मात्र हा सिनेमा "मुघल-ए-आझम'शी नव्हे, तर "जाने भी दो यारो'शी संबंधित आहे. गेल्या काही वर्षांमध्ये चटपटीत लिखाणात छेल यांनी चांगलं यश मिळवलं आहे, पण दहा-पंधरा चांगले संवाद आणि प्रसंगांमुळं सिनेमा बनत नाही, हे छेल यांना ठाऊक नसावं. एकाच कथानकातून त्यांनी देशभक्ती, प्रेम, रहस्य मांडण्याचा प्रयत्न केलाय आणि अपेक्षेप्रमाणे एक ना धड... असा "फील' या सिनेमाला आलाय. परेश रावल, के. के. मेनन, राहुल बोस, मल्लिका शेरावत अशी चांगली "कास्ट' असूनही वेगळेपणाच्या हव्यासामुळं ती "वेस्ट' गेलीय.
या चित्रपटालाही बॉम्बस्फोटाचीच पार्श्वभूमी आहे. 1993 मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटांची तयारी फेब्रुवारीत झाली. लेखकानं त्याचा संबंध आपल्या कथानकाशी जोडलाय. गोव्यातील एका नाटक कंपनीचा परेश रावल हा मुख्य अभिनेता. मल्लिका शेरावत ही त्याची पत्नी. "मान गये मुघल-ए-आझम' या नाटकात परेश अकबर बादशहाचा, तर मल्लिका अनारकलीची व्यक्तिरेखा साकारीत असते. राहुल बोस हा "रॉ'चा एक अधिकारी. तो गुन्हेगारांच्या शोधासाठी गोव्यात येतो आणि मल्लिकाच्या प्रेमात पडतो. तो आणि मल्लिका देशप्रेमाच्या नावाखाली परेश रावलचा वापर करून घेतात. चित्रपटाचा व्हिलन झालाय तो के. के. मेनननं साकारलेला एका गझल गायक. त्याचे गुन्हेगारी जगताशी संबंध असतात. मल्लिका आणि परेश रावळच्या मदतीनं राहुल बोस हे संबंध उघडकीस आणतो.
"जाने भी दो यारो'द्वारे दिग्दर्शक कुंदन शहा यांनी एक छान सामाजिक-राजकीय प्रहसन सादर केलं होतं. संजय छेल यांना या सिनेमातून असंच काहीतरी अपेक्षित होतं, पण कच्च्या लिखाणामुळं त्यांची ही अपेक्षा पूर्ण होऊ शकलेली नाही. छेल यांच्यातील लेखक एवढा कमी पडला आहे की, या चित्रपटाला सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत "ग्रीप' घेता आलेली नाही. दहा पाच-दहा मिनिटांनी एखाद-दुसरा चांगला संवाद, या गतीनं हा सिनेमा सुरू राहतो. परेश-मल्लिकाच्या व्यक्तिरेखा चांगल्या उभ्या राहिल्यात, पण राहुल बोस आणि के. के. मेनन यांच्याबद्दल तसं म्हणता येत नाही. या सिनेमात "मान गये...' हे नाटक बऱ्याचदा पाहायला मिळतं. या नाटकातली कलाकार मंडळी वारंवार आपले संवाद बदलतात, नको ती "ऍडिशन्स' घेतात, त्यांच्या अभिनयात कोणतंही गांभीर्य दिसत नाही... तरीसुद्धा हे नाटक पाहायला अनेकांनी गर्दी केल्याचं दिसतं.
मल्लिका आणि राहुल बोस यांचं खरोखरीच "अफेअर' असतं की राहुलच्या देशप्रेमाचा तो एक भाग असतो, याचा सिनेमा संपला तरी पत्ता लागत नाही. परेश रावल हे "सीझन्ड ऍक्टर' असल्यामुळे त्यांनी आपला भाग तयारीनं सादर केलाय. मल्लिकानंही आपल्या मर्यादा सांभाळून त्यांना चांगली साथ दिलीय. राहुल बोसची "इमेज' या सिनेमाद्वारे तोडण्यात आलीय. के. के. मेनन त्याच्या भूमिकेत अगदीच "मिसफिट' वाटलाय. अन्नू मलिक यांचं संगीत ऐकताना या चौघांचा गोंधळ बरा म्हणायची वेळ येते. त्यामुळे हा सिनेमा संपल्यानंतर छेल यांना एखादं नवीन स्वप्न पडो, एवढीच काय ती शुभेच्छा द्यावीशी वाटते.

review-मुंबई मेरी जान
मुंबई... जी कधी थकत नाही आणि जी कधीही दमत नाही... असा मुंबईनगरीचा गौरव केला जातो. कधी नैसर्गिक आपत्ती असो किंवा कधी दहशतवादानं मांडलेला क्रूर खेळ असो... अनेक संकटं कोसळूनही हे शहर काहीच घडलं नसल्याप्रमाणे आजवर कार्यरत राहिलेलं आहे. हिंदी चित्रपटांमधून ही मुंबई अनेक वेळा प्रेक्षकांसमोर आली आहे, पण या मुंबईला जिवंत ठेवणारा सर्वसामान्य मुंबईकर सेल्युलॉईडद्वारे प्रभावीपणे अपवादानेच आपल्यासमोर आलाय. ही कसर निशिकांत कामत यांच्या "मुंबई मेरी जान' या सिनेमानं भरून काढलीय. मुंबईत 2006 च्या जुलैत लोकलमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांची पार्श्वभूमी निवडत कामत यांनी मुंबईच्या "स्पिरिट'ला एक आगळावेगळा सलाम ठोकलाय. तो आपण स्वीकारलाच पाहिजे. बॉम्बस्फोट का घडला, कोणी घडविला, त्याचे धागेदोरे कसे मिळाले... या "रिसर्च'मध्ये गुंतून न पडता दिग्दर्शकानं आपला केंद्रबिंदू सर्वसामान्य मुंबईकरांवर ठेवलाय. त्यामुळेच हा सिनेमा पाहणाऱ्याच्या हृदयाला भिडतो, त्याला अनेकदा अस्वस्थ करतो आणि मुंबईकरांच्या उपजत "ह्युमर'ला दाद देण्यास भाग पाडतो. "युटीव्ही'ची दर्जेदार निर्मिती, कसदार लेखन, संजय जाधव यांचं अप्रतिम कॅमेरावर्क आणि कामत यांच्या "पॉलिश्ड' दिग्दर्शनामुळं हा सिनेमा वेगळ्या वाटेचा असूनही अत्यंत परिणामकारक ठरलाय.
बॉम्बस्फोट होण्याआधी; तसेच तो झाल्यानंतर सहा व्यक्तींच्या आयुष्यावर दिग्दर्शकानं आपला "फोकस' ठेवलाय. परेश रावल हे पोलिस दलातील एक वरिष्ठ कॉन्स्टेबल दाखवलेत. अवघ्या दहा दिवसांनंतर ते पोलिस सेवेतून निवृत्त होणार असतात. विजय मौर्या हा त्यांचा तरुण सहकारी. या दोन व्यक्तिरेखांमधील संवादांद्वारे दिग्दर्शकानं अख्ख्या पोलिस दलाचं "आरपार' चित्र उभं केलंय. हिंदी चित्रपटांमधील पोलिस हा नेहमीच विनोदाचा विषय झालाय. हा सिनेमा त्याला छेद देऊन गेलाय. सोहा अली खान ही एका चॅनेलमधील तरुण, तडफदार पत्रकार. लोकलमध्ये बॉम्बस्फोट झाल्यानंतर तिच्यातली पत्रकार जागी होते, मात्र आपला पती बॉम्बस्फोटात मरण पावल्याचं तिला समजतं. या वेळी बातमी शोधायला गेलेली सोहा आपल्याच चॅनेलची एक "ब्रेकिंग न्यूज' ठरते आणि तिचा "बाईट' घेण्यापर्यंत मजल जाते.
या सिनेमातलं चौथं व्यक्तिमत्त्व आहे ते इरफान खान. दक्षिणेतल्या कोणत्यातरी खेडेगावातून आलेली ही व्यक्ती मुंबईत सायकलवरून चहा-कॉफी विकत असते. बॉम्बस्फोटानंतर काही तासांतच त्याची भेट परेश रावल आणि विजय मौर्याशी होते आणि त्याच्या आयुष्याला वळण मिळतं. आपला काही गुन्हा नसताना पोलिस त्रास देत असल्यामुळे इरफान त्यांच्यावर वेगळ्या पद्धतीनं सूड उगवतो. कधी मॉलमध्ये खोटा बॉम्ब ठेवल्याचा फोन कर; तर कधी रेल्वेस्थानकामध्ये, मात्र त्याच्या एका खोट्या फोनमुळं एका व्यक्तीला "हार्टऍटॅक' येतो. या वेळी इरफानचं झालेलं परिवर्तन आणि त्यानंतर त्याची कृती या सिनेमाला हळूहळू उंचीवर नेऊ लागते. माधवन हा कट्टर देशभक्त. प्रदूषणाचं प्रमाण रोखण्यासाठी तो स्वतः ऐपत असूनही चारचाकीमधून न फिरता लोकलमधूनच प्रवास करीत असतो, मात्र बॉम्बस्फोटाचा "आँखो देखा हाल' पाहिल्यानंतर त्याचं आयुष्यच बदलतं. के. के. मेनन हा सुशिक्षित बेरोजगार. कॉम्प्युटर इंजिनियर असूनही त्याला चांगली नोकरी मिळत नाही. मग काय, रिकाम्या मनात सैतानाचं भूत अवतरणारच. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सर्व मुस्लिमांकडे तो ते दहशतवादीच आहेत, या नजरेतून बघत असतो आणि आपल्या मित्रांचेही कान भरत असतो, मात्र बॉम्बस्फोटानंतर अशा काही घटना घडतात, की त्याचे डोळे उघडतात.
योगेश विनायक जोशी आणि उपेंद्र सिधये यांनी या सिनेमाची कथा-पटकथा लिहिलीय. या सहा व्यक्तींचे पाच "ट्रॅक' परस्परांमध्ये मिसळणं हे खूप अवघड काम होतं, पण लोकलचा एका "ट्रॅक'वरून दुसऱ्या ट्रॅकवर जाताना जो खडखडाट होतो, तसा खडखडाट लेखक-दिग्दर्शकानं होऊ दिलेला नाही. हे त्यांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. परेश रावल आणि विजय मौर्याचा "ट्रॅक' सर्वाधिक परिणामकारक आहे. सोहा आणि माधवनचा "ट्रॅक' ठीकठाक असून, इरफानचा खूप वेगळा वाटतो. तुकाराम पाटील या व्यक्तिरेखेत परेश रावल यांनी कमाल केलीय. या कलाकाराला कोणताही "रोल' द्या, त्यात त्याचं भिडणं विलक्षण असतं. रावल यांच्या कारकिर्दीतील काही भन्नाट भूमिकांपैकी ही भूमिका एक ठरावी. विजय मौर्या यांनी रावल यांना खूप छान साथ दिलीय. चांगला दिग्दर्शक असेल; तर सोहा अली खानचा प्रभाव जाणवतो, हे यापूर्वीही दिसून आलं होतं. या सिनेमात नेमकं तेच पाहायला मिळतं. इरफान खान, माधवन आणि के. के. मेनन हे तिघेही आपापल्या व्यक्तिरेखा साकारताना अगदी "टॉप फॉर्म'मध्ये वाटतात. सिनेमाच्या शेवटी "ये दिल है मुश्किल...' हे गाणं "बॅकग्राऊंड'वर ऐकविण्याची कल्पनाही भन्नाट आहे. "डोंबिवली फास्ट'मुळे वाढलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यात कामत यांना यश आलंय. हिंदी चित्रपटसृष्टीवर राज्य करण्यासाठी आणखी एक मराठी दिग्दर्शक सज्ज होतोय. त्याच्या या प्रयत्नांचं कौतुक करायला हवं.

Wednesday, July 23, 2008
"कॉन्ट्रॅक्ट' review
हुकमाचा एक्काही कामी !
"सरकार राज'ला बऱ्यापैकी आकार देण्यात रामगोपाल वर्मांना यश आल्यानं हा दिग्दर्शक पुन्हा माणसात येतोय, असं वाटत होतं. मात्र, "कॉन्ट्रॅक्ट' पाहिल्यानंतर तसं काही झालं नसल्याची खात्री पटते. गेल्या काही वर्षांमध्ये वर्मांनी आपल्या चित्रपटांमधून बरेच प्रयोग केले. "गॅंगवॉर'पट सोडले तर त्यांचे बहुतेक सर्व प्रयोग फसले. "सत्या', "कंपनी'नंतर वर्मांनी "कॉन्ट्रॅक्ट' बनवला तो गॅंगवॉरपटांची त्रिधारा पूर्ण करण्यासाठी. या विषयात त्यांची मातब्बरी असल्यानं "कॉन्ट्रॅक्ट'द्वारे ते निराश करणार नाहीत, असं वाटत होतं. पण, सूर हरवलेल्या वर्मांचा हुकमाचा एक्काही या सिनेमात चाललेला नाही. या सिनेमात त्यांनी "अंडरवर्ल्ड'चा दहशतवादाशी संबंध जोडण्याचा प्रयत्न केलाय. मात्र, एवढा स्फोटक विषय हाताळण्यासाठी आवश्यक तेवढी मेहनत वर्मांनी घेतलेली नाही. "रॉ स्टॉक'मधली काही दृश्यं जोडून एखादा सिनेमा तयार व्हावा, असा "फील' हा चित्रपट पाहताना येतो. दहशतवादाच्या मुळाशी जाण्याऐवजी वर्मांनी दोन गॅंगमधला बटबटीत हिंसाचार चित्रपटभर दाखवलाय. एका प्रतिभाशाली दिग्दर्शकाची ही उतरती भाजणी खऱ्या सिनेमा शौकिनासाठी धक्कादायक आहे.
अमन (अध्मिक महाजन) हा लष्करातून बाहेर पडलेला एक तरुण. त्याचं सळसळतं रक्त पाहून अहमद हुसेन (प्रसाद पुरंदरे) हा पोलिस अधिकारी प्रभावित होतो. दहशतवादाचा समूळ नायनाट करण्यासाठी त्याचा उपयोग करून घेण्याचं तो ठरवतो. "आरडी' नावाच्या दहशतवादाच्या टोळीत शिरून त्याचा बंदोबस्त करण्याची योजना तो त्याच्यापुढं ठेवतो. पण, अमनला शांततेत आयुष्य जगायचं असल्यानं तो हे काम करण्यास नकार देतो. काहीच दिवसांमध्ये दहशतवाद्यांनी घडवलेल्या बॉम्बस्फोटात अमनची पत्नी आणि मुलीचा मृत्यू होतो. आपल्या घरापर्यंत पोचलेलं हे दहशतवादाचं लोण पाहून अमन हादरतो. अहमद हुसेन यांचा "प्लॅन' तो मान्य करतो आणि गुन्हेगार बनून "आरडी'च्या टोळीत सहभागी होतो. "आरडी'चा "नंबर वन' शत्रू असलेल्या गुंगाच्या (उपेंद्र लिमये) टोळीवर तो तुटून पडतो. मात्र, सरतेशेवटी या चक्रव्यूहातून बाहेर पडणं त्याला कठीण होतं.
वर्मांचा सूर साफ हरविल्याची लक्षणं संपूर्ण "कॉन्ट्रॅक्ट'मध्ये पाहायला मिळतात. टोळीयुद्धाचा दहशतवादाशी संबंध जोडताना वर्मांकडून अभ्यासपूर्ण हाताळणीची गरज होती. पण, दोन गॅंगमधला रक्तरंजित हिंसाचार एवढ्यापुरताच हा सिनेमा मर्यादित राहतो. चित्रपटाचा हीरो अमन लष्करातून बाहेर का पडतो, याचे सबळ कारण सिनेमात पाहायला मिळत नाही. केवळ एका पोलिस अधिकाऱ्याच्या इच्छेसाठी तो "आरडी' या दहशतवाद्याच्या टोळीत शिरायला तयार होतो, असं या सिनेमात दाखविण्यात आलंय. तसेच त्याचा या टोळीतील प्रवेश अगदी लुटूपुटूचा वाटतो. आरडीचा शत्रू गुंगाला कायम समुद्रातल्या बोटीवर दाखवून दिग्दर्शकानं त्याच्या अस्तिस्तावरही मर्यादा आणल्यात. बोटीवरचे सगळेच प्रसंग अगदीच बटबटीत झाले आहेत. वर्मांमधल्या दिग्दर्शकानं आपल्या सहाय्यकांकडून तांत्रिक कामं छान करवून घेतली आहेत. पण, चांगल्या सिनेमासाठी आवश्यक असलेल्या पटकथेबाबत त्यांनी डोळेझाक केलीय. या चित्रपटातले संवाद अगदीच कामचलाऊ आहेत. अमनची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अध्मिक महाजनचा हा पहिला चित्रपट असून त्याचं नवखेपण जाणवत राहतं. पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत प्रसाद पुरंदरे यांनी आपली चांगलीच छाप उमटवली आहे. उपेंद्र लिमये यांची व्यक्तिरेखा सुरुवातीला चांगली वाटते. पण, नंतर या व्यक्तिरेखेला दिग्दर्शकानं जे जे चाळे करायला लावलेत, त्यामुळं तिचा प्रभाव कमी झालाय. दिग्दर्शकाला ही व्यक्तिरेखा "सत्या'मध्ये मनोज वाजपेयीनं साकारलेल्या भिकू म्हात्रेच्या जवळपास नेण्याची इच्छा असावी. पण, प्रत्यक्षात तसं घडलेलं नाही. अमृता सुभाष यांनी आपल्या वाट्याला आलेली "लाऊड' भूमिका आणखीनच "लाऊड' केलीय. अमृता खानविलकरची भूमिका खूपच छोटी आहे. अमर मोहिले यांचं संगीत त्यातल्या त्यात बरं आहे. एकंदरीत वर्मांमधल्या दिग्दर्शकाचा असा हरवलेल
ा सूर पाहणं, ही खरोखरीच खूप तापदायक गोष्ट आहे.

Tuesday, July 22, 2008
किस्मत कनेक्शन review
"लूज' कनेक्शन !
दिग्दर्शक अजिज मिर्झांची ओळख म्हणजे "राजू बन गया जंटलमन', "येस बॉस', "चलते चलते' हे चित्रपट. हलकेफुलके विषय आणि त्याची तितकीच हलकीफुलकी हाताळणी, हे त्यांच्या सिनेमाचं ठळक वैशिष्ट्य. "चलते चलते'च्या यशानंतर तब्बल पाच वर्षांनी त्यांनी "किस्मत कनेक्शन' हा सिनेमा बनवलाय. दरम्यानच्या काळात हिंदी सिनेमा खूप बदललाय. त्यांची ही विश्रांती सिनेमातही जाणवते. यावेळी मिर्झांनी आपल्या सिनेमातून मनोरंजनाबरोबरच "सोशल मेसेज' देण्याचा प्रयत्न केलाय. पण या दोन्ही गोष्टींचं करण्यात आलेलं "कनेक्शन' चांगलंच "लूज' झालंय आणि इथंच हा सिनेमा गडबडलाय. काही "पॅचेस'मध्ये हा सिनेमा चांगला वाटतो. मात्र, तेवढ्यासाठी तो संपूर्ण पाहणं तापदायक ठरेल. "जब वुई मेट' आणि "लगे रहो मुन्नाभाई' असं भिन्न पद्धतीचं मनोरंजन दिग्दर्शकाच्या डोक्यात होतं. ते प्रत्यक्षात पडद्यावर भलत्याच रूपात उतरलंय.
हिंदी सिनेमातल्या हीरोचं चावून चोथा झालेलं नाव म्हणजे राज मल्होत्रा. मिर्झांनी आपल्या हीरोला नेमकं हेच नाव दिलंय. शिक्षणात त्यानं मोठी मजल मारलेली असते. मात्र, शिक्षण पूर्ण होऊन पाच वर्षें उलटली तरी त्याला नोकरी-व्यवसायात जम बसवता आलेला नसतो. त्याचं नशीब उघडतं ते प्रियाच्या (विद्या बालन) आगमनानंतर. दोन-चार प्रसंगात या दोघांची अपघातानं भेट होते आणि प्रत्येक वेळी ही भेट राजला फायदेशीर ठरते. प्रिया एक वृद्धाश्रम (मिर्झांनी त्याला "कम्युनिटी सेंटर' असं गोंडस नाव दिलंय) चालवीत असते. या वृद्धाश्रमाच्या जागेवर एक मॉल उभारण्यात येणार असतो. या मॉलचं काम मिळवण्यासाठी राजची धडपड सुरू असते. वृद्धाश्रम सुरू ठेवून तिथं आपण मॉल बांधण्याचा बिल्डरवर दबाव आणू, असं चित्र तो प्रियासमोर उभं करतो. प्रियाला ते खरंच वाटतं. या प्रवासादरम्यान दोघं एकमेकांच्या प्रेमात पडतात. पण मॉल उभारण्याचा निर्णय होऊन तिथं वृद्धाश्रम बांधलं जाणार नसल्याचं स्पष्ट होतं तेव्हा प्रियाचे डोळे उघडतात. अखेरीस राजसुद्धा प्रियाच्या प्रेमासाठी आपला "प्रॅक्टिकल ऍप्रोच' दूर ठेवतो आणि एक प्रेमकहाणी यशस्वी होते.
संजय छेल या यशस्वी पटकथा लेखकानं हा सिनेमा लिहिलाय. पण वर उल्लेख केल्याप्रमाणे मनोरंजन आणि "सोशल मेसेज' यांचा सांधा त्यांना जोडता आलेला नाही. छेल आणि मिर्झा बऱ्याच आघाड्यांवर अपयशी ठरलेत. एक तर त्यांना शाहिद कपूर आणि विद्या बालन यांच्यातली प्रेमकहाणीसुद्धा छानपणे रंगविता आलेली नाही. "जब वुई मेट'च्या "ट्रॅक'वर ही प्रेमकहाणी चालते खरी. मात्र, त्या चित्रपटातला फ्रेशनेस, त्याची ट्रीटमेंट इथं पाहायला मिळत नाही. चित्रपटाचा उत्तरार्ध "लगे रहो...'च्या वळणानं जातो. पण इथंही तीच चूक पुन्हा घडलीय. विद्या बालनचा ना वृद्धाश्रम खरा वाटतो, ना त्यातली वृद्ध मंडळी. सगळाच प्रकार अगदी बेगडी झालाय. संपूर्ण चित्रपट कॅनडामध्ये चित्रीत झालाय.
कलाकार कितीही चांगला असो, पटकथेत गडबड झाली की त्याची मात्रा चालत नाही. हा अनुभव शाहिद कपूरचा अभिनय पाहताना येतो. त्यानं अनेक दृश्यांमध्ये शाहरूख खान आणि दिलीपकुमार यांची नक्कल केलीय. मात्र, "जब वुई मेट'मध्ये दिसलेला खराखुरा शाहिद कपूर इथं अपवादानंच दिसतो. विद्या बालननं या सिनेमातून आपला "लूक' बदललाय. पण व्यक्तिरेखेनं तिला यावेळी हात दिलेला नाही. त्यामुळं या दोघांचं पडद्याबाहेरचं "कनेक्शन' सध्या गाजत असलं तरी प्रत्यक्ष चित्रपटात ते अपवादानंच पाहायला मिळतं. शाहिदच्या मित्राच्या भूमिकेत पाहायला मिळणाऱ्या विशाल मल्होत्रानं केलेली धमाल त्यातल्या त्यात प्रेक्षकांची करमणूक करते. ओम पुरी यांनी साकारलेली बिल्डरची भूमिकाही चांगली आहे. प्रितम यांनी संगीतबद्ध केलेली एक-दोन गाणीच जमली आहेत.

Monday, July 14, 2008
किरण देवहन्स interview
कॅमेरामन से डायरेक्शन तक!
"कयामत से कयामत तक', "अक्स', "कभी खुशी कभी गम' आणि "जोधा अकबर' या परस्परभिन्न चित्रपटांचे छायादिग्दर्शक ही किरण देवहन्स यांची एक ठळक ओळख. जाहिरात क्षेत्रामध्ये गेल्या 20 वर्षांमध्ये केलेली कामगिरी ही त्यांची दुसरी ठळक ओळख. त्यांच्या नावावर सध्या हजारहून अधिक जाहिराती जमा आहेत. चित्रपट तसेच जाहिरात क्षेत्रामधील करियरबद्दल त्यांच्याशी केलेली चर्चा.
---------------
किरण देवहन्स मूळचे पुण्याचे. कॅमेरामन, ऍडफिल्ममेकर म्हणून नाव कमावणारे देवहन्स चांगले चित्रकार आहेत. शालांत अभ्यासक्रमातील "एलिमेंटरी' परीक्षेत ते तीन दशकांपूर्वी राज्यातून पहिले आले होते. मात्र, त्या काळात कला क्षेत्राकडं चांगल्या नजरेनं पाहिलं जात नसल्यामुळं ते फर्ग्युसन कॉलेजमध्ये दाखल झाले. तिथं पदवी घेतल्यानंतर "फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट'मध्ये (एफटीआयआय) त्यांनी प्रवेश घेतला. चित्रपट माध्यमातल्या सर्व शाखांचं तिथं शिक्षण दिलं जात असलं तरी देवहन्स यांना कॅमेरा या प्रकारातच अधिक गती होती. विशेष म्हणजे शेवटच्या वर्षी ते आपल्या गटात सर्वोत्कृष्ट कॅमेरामन ठरले. मुंबईतील आपल्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल ते सांगतात, ""नदीम खान यांच्याकडे मी सुरुवातीला सहाय्यक म्हणून काम केलं. "कसम पैदा करनेवालो की', "इल्जाम', "अलग अलग' यांसारखे अनेक चित्रपट मी त्या वेळी केले. त्या काळात छायादिग्दर्शकांना फारसे चांगले मानधन मिळत नसे. त्यामुळे त्यांना एका वेळी पाच-सहा चित्रपट करावे लागायचे. माझ्या नशिबानं खान यांच्याकडचे दोन सहाय्यक एकाच वेळी नोकरी सोडून गेले. त्यांचं जाणं माझ्या पथ्यावर पडून काही चित्रपटांचं मला स्वतंत्रपणे काम करण्याची संधी मिळाली. "तारे जमीं पर'मुळे प्रकाशात आलेले अमोल गुप्ते माझे चांगले मित्र. त्यांच्यामुळं माझी मन्सूर खान यांच्याबरोबर ओळख झाली आणि मला "कयामत से कयामत तक' हा पहिला सिनेमा मिळाला. तत्पूर्वी मी त्याच्यासोबत दोन वर्षं जाहिरात क्षेत्रासाठी काम केलं होतं. या काळात मी त्याच्याबरोबर तब्बल 500 जाहिराती केल्या.''
सर्वसाधारणपणे कोणत्याही कलाकाराचा कारकिर्दीतला पहिला सिनेमा हिट गेला की त्याच्यावर नवीन चित्रपटांचा वर्षाव होतो. देवहन्स यांच्याबाबत नेमकं तसंच घडलं. शेखर कपूर, राहुल रवैल या मान्यवरांबरोबरच अनेकांनी देवहन्स यांना आपल्या चित्रपटासाठी छायादिग्दर्शक म्हणून काम करण्याची ऑफर दिली. पण यापैकी एकही ऑफर न स्वीकारण्यामागची भूमिका स्पष्ट करताना देवहन्स म्हणतात, ""काही चित्रपटांची फोटोग्राफी करूनही मला चांगले मानधन मिळाले नव्हते. चार जणांच्या खोलीतील एक अशीच माझी मुंबईतील ओळख होती. बाहेरगावहून कोणी नातेवाईक मला भेटायला आला तर त्याची व्यवस्था कुठं करायची, असा मला प्रश्न पडला. तेव्हा जाहिरात क्षेत्र की सिनेमा या दोन्हीपैकी एकाची निवड करणं गरजेचं होतं. कारण, जाहिरात क्षेत्रात चांगलं नाव कमाविण्यासाठी प्रथम तिथं चार-पाच वर्षं घालवावी लागतात. बऱ्याच विचारविनिमयानंतर मी जाहिरात क्षेत्राची निवड करून पुढची दहा वर्ष तरी सिनेमासाठी काम करायचं नाही, असा निर्णय घेतला. आज जेव्हा मी तटस्थपणे विचार करतो तेव्हा माझा हा निर्णय योग्य होता, असं लक्षात येतं. कारण, जाहिरात क्षेत्रात त्या काळात फारसे चांगले कॅमेरामन नव्हते. त्यामुळं मी चित्रीत केलेल्या बहुतेक सर्व जाहिराती गाजल्या. कालांतरानं मी माझं स्वतःचं "कॅंडिड क्रिएशन्स' नावाचं "प्रॉडक्शन हाऊस' सुरू केलं. या कंपनीतर्फे शाहरूख खान, सचिन तेंडुलकर, जुही चावला यांच्यावर चित्रीत केलेल्या सर्व जाहिराती खूप गाजल्या.''
1988 ते 1998 या दहा वर्षांमध्ये देवहन्स यांनी जवळपास एक हजारहून अधिक जाहिराती केल्या. राकेश मेहरांच्या "अक्स'मुळं पुन्हा ते छायादिग्दर्शनाकडं वळले. या चित्रपटांचे "रशेस' पाहिल्यानंतर करण जोहरनं आपल्या "कभी खुशी कभी गम' चित्रपटासाठी त्यांना आमंत्रित केलं. "फाईव्ह स्टार' सोयीसुविधा पुरविणारा दिग्दर्शक असा ते करणचा उल्लेख करतात. आशुतोष गोवारीकर यांचा "स्वदेस' चित्रपट त्यांना इतर "कमिटमेंटस्'मुळं करता आला नाही, पण गोवारीकर "जोधा अकबर'ची तयारी करीत आहेत, हे समजल्यानंतर त्यांनी स्वतःहून आपण या चित्रपटासाठी काम करण्यास तयार असल्याचं सांगितलं. विशेष म्हणजे या चित्रपटातील देवहन्स यांचं कॅमेरावर्क वाखाणलं गेलं. जाहिरात क्षेत्रामधील अत्युच्च दर्जाचं काम आणि बिगबजेट चित्रपटांमुळं देवहन्स कमी बजेटमध्ये काम करायलाच तयार नाहीत, असा एक समज या काळात त्यांच्याबद्दल झाला. तो खोटा ठरविण्यासाठी ते आता अभिनेत्री दीप्ती नवल यांच्या नवीन चित्रपटासाठी काम करणार आहेत. या चित्रपटापाठोपाठ एखाद्या बिगबजेट चित्रपटाचं छायादिग्दर्शन करण्याचा त्यांचा विचार आहे आणि त्यानंतर त्यांना स्वतःचा सिनेमा दिग्दर्शित करायचाय. हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या प्रत्येकाचं एक ना एक दिवस दिग्दर्शक बनण्याचं स्वप्न असतं. देवहन्स यांचा हा स्वप्नपूर्तीचा प्रवास अगदी अंतिम टप्प्यात आहे.

Subscribe to:
Posts (Atom)